श्री माघी गणेश जयंती उत्सव २०२६ निमित्त युनिटी क्रीडा मंडळ पाग यांचे विविध कार्यक्रम
चिपळूण (संतोष पिलके ) : शहरातील युनिटी क्रीडा मंडळ पाक यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी बुधवार दि. २१ जानेवारी ते शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री माघी गणेश जयंती ऊत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार, दि.२१ जानेवारी २०२६ सकाळी ९ वा. श्री सुकाईदेवी मंदिर ते श्री देव उघडा मारूती मंदिर पर्यंत गणेश मूर्ती आगमन मिरवणूक व पाग महिलांचे लेझिम पथक व विघ्नहर्ता ढोल पथकाच्या सुरेल वादनाने करण्यात आले .सकाळी १० वा. गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा पूजा व आरती करण्यात आली.
सायं. ४ ते ८ वा. महिलांचा हळदी-कुंकू समारंभ,सायं. ७.३० ते ८ वा. श्रींची महाआरती,रा. ८.०० ते ९ वा. : भजन,रात्री ९.०० वा.
स्वरदर्शन प्रस्तुत स्वरसुमनांजली (भावगीते) आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी
सकाळी ९ ते ११ वा. पूजा, सहस्त्रावर्तने व आरती
सायं. ५ ते ७ वा. ह.भ.प.श्री. सुरेंद्रजी जोशी यांचे गणेश जयंती उत्सवाचे कीर्तन,रा. ७.३० ते ८ वा.श्रींची महाआरती,रा. ०९.३० वा.
पाग मर्यादित रेकॉर्ड डान्स आणि कल्चरल डान्स आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शुक्रवार, दि.२३ जानेवारी २०२६ सकाळी ९ ते १० वा. पूजा व आरती,स. १० ते सायं. ४ वा. मोफत आरोग्य शिबीर,
स. ११ ते १२ वा. भजन,सायं. ४ ते ५ वा. श्रींची उत्तरपूजा व महाआरती,सायं. ५ वा.
श्रींची विसर्जन मिरवणूक करून उत्सवाची समाप्ती करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.



