Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedन्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबडस येथे पालक सभा उत्साहात

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबडस येथे पालक सभा उत्साहात

 चिपळूण (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबडस येथे इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह बोर्ड परीक्षेची तयारी, अभ्यासपद्धती व पालकांची भूमिका यावर या सभेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सभेचे अध्यक्ष म्हणून शालेय समितीचे सदस्य दीपक गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शालेय समितीचे चेअरमन अशोक निर्मळ यांनी पालकांना संबोधित करताना, “बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची पायरी असून शिक्षक-पालक-विद्यार्थी यांचा समन्वय अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक तयारीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत यादव यांनी इयत्ता १० वी व १२ वी व ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची रूपरेषा, परीक्षेचे नियोजन, वेळापत्रक, अंतर्गत मूल्यमापन व मार्गदर्शन वर्ग याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, सराव परीक्षा आणि वेळेचे योग्य नियोजन करावे, असे मार्गदर्शन केले. या पालक सभेत पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या यशासाठी पालकांचा सकारात्मक सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पालकांनीही शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत सहकार्याची भूमिका दर्शवली.पालक सभेचे सूत्रसंचलन कृष्णकांत कुंभार यांनी केले. आभार प्रदर्शन महेश कुलकर्णी यांनी मानले. सभा यशस्वी होण्यासाठी गणेश सावर्डेकर व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती महाडिक व त्यांच्या सहकारी शिक्षिका उपस्थित होते उपस्थित पालकांनी सभेचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments