Saturday, May 2, 2026
Google search engine
Homeरत्नागिरीचिपळूणचिपळुणात शिवजयंती पूर्वतयारी बैठक उत्साहात ; समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

चिपळुणात शिवजयंती पूर्वतयारी बैठक उत्साहात ; समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

चिपळुणात शिवजयंती पूर्वतयारी बैठक उत्साहात ; समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

चिपळूण (संतोष पिलके ) : येथे येत्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती पूर्वतयारी बैठक काल २५ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या बैठकीत शिवजयंती अधिक भव्य, वैचारिक आणि सर्वसमावेशक कशी साजरी करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत साहसी खेळ, झांज पथक, हळदी-कुंकू कार्यक्रम, होम मिनिस्टर स्पर्धा, एखाद्या महाज्ञानी व्यक्तीचे प्रेरणादायी व्याख्यान, तसेच लहान मुलांसाठी वकृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांवर सकारात्मक चर्चा झाली.

बैठकीला उपस्थित राहू न शकलेल्या सदस्यांनीही ग्रुपवर आपले विचार व नवीन संकल्पना मांडाव्यात, जेणेकरून त्यांचा पुढील नियोजनात विचार करता येईल, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीस राणीताई महाडीक, पूर्वा ताई, स्वरा ताई, घाडगे ताई, पूर्वा तांदळे ताई, चव्हाण ताई तसेच मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका तसेच महिला व बालकल्याण विकास सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सौ. राणीताई महाडीक यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शिवजयंतीनिमित्त कुणाकडे नवीन कल्पना किंवा उपक्रमांच्या संकल्पना असतील, त्यांनी त्या पुढील बैठकीत उपस्थित राहून किंवा वेळेत ग्रुपवर मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

शेवटी सर्वांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शिवमय शुभेच्छा देत जय शिवराय, एक मराठा – लाख मराठा, असा जयघोष करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments