Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*माजी आमदार सदानंद चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी* *वेहेळे पंचायत समिती गणातून अपक्ष...

*माजी आमदार सदानंद चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी* *वेहेळे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार संजय जाबरे यांची माघार : युतीमध्ये जल्लोष*

चिपळूण – जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून पहिल्या टप्प्यात शिवसेना भाजप युतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. अशातच आज वेहेळे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार संजय जाबरे यांनी माघार घेत शिवसेना भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला.शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी या गणात यशस्वी मध्यस्थी करून युतीचे पारडे मजबूत केले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवणुकीसाठी जवळपास सर्वच गणात,गटात तिरंगी चौरंगी लढतीची शक्यता आहे.उद्या मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.मात्र या दिवसाची वाट न पाहता शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यशस्वी मध्यस्थी केली. दोन दिवसांपूर्वी निवळी पंचायत समिती गणातून स्वाती जंगम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.तर आता शिरगांव जिल्हा परिषद गटातील वेहेळे पंचायत समिती गणातून पंचक्रोशीतील कुणबी बहुजन समाजाचे तरुण आणि अभ्यासू कार्यकर्ते संजय जाबरे यांनी सदानंद चव्हाण आणि प्रशांत यादव यांच्या विनंतीचा मान राखत निवडणुकीतून माघार घेतली आहे.उद्या मंगळवारी ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील.आज सर्व प्रमुख मंडळीसह त्यांनी सदानंद चव्हाण आणि प्रशांत यादव यांची भेट घेत युतीच्या तिन्ही उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला.युतीच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करू असा शब्द जाबरे यांनी चव्हाण आणि यादव या दोघांना दिला.याविषयी माहिती देताना सदानंद चव्हाण म्हणाले की,संजय जाबरे हे आपले जवळचे सहकारी आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आमच्या विनंतीचा मान राखून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिवसेना भाजप महायुतीला पाठिंबा जाहीर केला.हा आमच्या विजयासाठी शुभ संकेत आहे.येणाऱ्या काळात संजय जाबरे यांनी केलेल्या त्यागाचा निश्चित विचार केला जाईल तर त्या माध्यमातून त्यांचा आणि पर्यायाने कुणबी बहुजन समाजाचा योग्य तो सन्मान राखला जाईल असेही सदानंद चव्हाण यांनी सूचित केले. आता वेहेळे गणासह संपूर्ण जिल्हा परिषद गटात किंबहुना तालुक्यात महायुतीची बाजू बळकट झाली असून युतीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून संजय जाबरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments