कडवई जि. प. गटातील भाजपच्या एका नेत्याचा राजीनामा ; ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा राजकीय धक्का ?
चिपळूण (संतोष पिलके ) – संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटातील भाजपच्या एका नेत्याने राजीनामा दिला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. एका मोठ्या पदावर असलेल्या या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे.
सदर नेता गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होता. संघटनात्मक जबाबदारी सोबतच त्याने पक्षवाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र अचानकपणे त्याने पक्षाला रामराम ठोकल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हा नेता आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडींचा कडवई जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, भाजपासाठी ही बाब चिंतेची मानली जात आहे. तर या नेत्याने राजिनामा दिल्याने याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.



