चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे स्वायत्त महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावून क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. सदरची स्पर्धा घरडा इन्स्टिट्यूट लवेल येथे संपन्न झाली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात डीबीजेच्या संघाने आयटीआय या संघावर अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयी संघाला रोख रक्कम दहा हजार ,प्रमाणपत्र व शील्ड देऊन गौरविण्यात आले. दाऊद जाबले याने संघाचे कर्णधार पद भूषविले. तसेच या स्पर्धेमध्ये अमीन पोटे, दाऊद जाबले यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाजी करून संघाला विजय प्राप्त करून दिला. कैफ बागवान, अमान, अथर्व गोटल यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. या संघामध्ये अथर्व गोटल, वेदांत कांबळे, अमान पोटे, आयुष्य सुर्वे, अयान, दाऊद जाबले, कैफ बागवान, वेदांत धुळप, उमेर परकार, अदनान गोठे आणि शामस् मुकादम हे खेळाडू होते. संघाच्या विजय कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, व्हा. चेअरमन डॉ. दीपक विखारे, सचिव अतुल चितळे, खजिनदार संजीव खरे, नियामक समितीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख डॉ.सम्राट माने, कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख प्रा. विलास जोशी, क्रीडा शिक्षक प्रा. उल्हास मोहिते, प्रा. जीवनराज कांबळे, प्रा. राम कदम यांनी अभिनंदन केले.
*आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डीबीजेचे वर्चस्व*
RELATED ARTICLES



