Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedउमरोली जि.प. गटात भाजपा, शिवसेना युती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, उबाठा,...

उमरोली जि.प. गटात भाजपा, शिवसेना युती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, उबाठा, अपक्ष चौरंगी लढत

चिपळूण (वार्ताहर) : उमरोली जि.प. गट खुला प्रवर्ग आहे. उमरोली प.स.गण खुला गुढे पंचायत समिती गण इतर मागास स्त्री वर्ग आहे. निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू आहे. या मतदार संघात चौरंगी लढत आहे. भाजपा, शिवसेना युती, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. उबाठा, अपक्ष अशी जि.प. साठी जोरदार राजकीय लढत आहे.

जि.प.साठी भाजपामधून चिवेलीचे सरपंच योगेश शिर्के, उबाठा मधून प्रमोद सुरेश निवळकर, राष्ट्रवादी काँग्रेस मधून मार्गतामाने खुर्द चे माजी सरपंच निलेश चव्हाण, काँग्रेस पक्षातर्फे नंदूशेठ थरवळ यांनी अर्ज मागे घेतला आहे, अपक्ष म्हणून योगेश खांडेकर, उमरोली प.स. गणा मधून भाजपा शिवसेना युतीचे माजी सभापती जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण, उबाठा मधून गौरव पाटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रावळगावचे अरविंद सुर्वे येथे तिरंगी लढत आहे. गुढे प.स. गण हा इतर मागास स्त्रीसाठी राखीव असून चिवेलीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. सायली संतोष बंगाल उबाठा मधून सुप्रिया प्रितम वंजारे, भाजपामधून आराध्या अमोल रावणंग, उमरोली जि.प.गटात एकूण २१ गावे असून १७२ वाड्या, २८ बूथ आहेत. एकूण मतदार २० हजार १७५ पैकी स्त्री मतदार १० हजार ५१०, पुरुष मतदार ९ हजार ६६५ आहेत. स्त्री मतदार संख्या अधिक असून त्यांच्या मतावर विजयांचा कौल कोणाला मिळतो ते कळेल. उमरोली गटात उमरोली, रामपूर, मार्गताम्हाणे ही तीन गावे राजकीय दृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्व उमेदवार वाडी निहाय बैठक, गाठी भेठी, संपर्क चालू आहे. कोणाच्या गळ्यात विजयी माळ पडते याची उत्सुकता आहे. सर्व पक्ष राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. उमरोली जि.प. गटात उमरोली, रामपूर, मार्गताम्हाणे,  कळमुंडी, तनाळी, उभळे, गुढे, डुगवे, मिरवणे, पाथर्डी, आंबेरे, कात्रोळी, रावळगाव, निर्व्हाळ, कौंढरताम्हाणे, मजरेकौंढर, गोंधळे, चिवेली, बोरगाव, बामणोली, वाघिवरे ही गावे येतात. उमेदारांची खरी कसोटी लागणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments