मंडणगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शेनाळे या शाळेचे मुख्याध्यापक सुनिल आईनकर यांच्या संकल्पनेतून कलाविष्कार २०२६ विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध स्तरातील मान्यवरानी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक गीतांपासून स्वरचित गीते तसेच विविध समुहनृत्य, गोंधळ, लावणी, पारंपरिक नृत्य, संबळ वादन ,विनोदी नाटिका अशा विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपापली कला सादर केली.संपूर्ण कार्यक्रम मराठमोळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. एकही हिंदी गाणे संपूर्ण कार्यक्रमात लावण्यात आले नाही, याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक गणेश गुळेकर सतीश खैरे, सागर कोबनाक, संतोष मोरे,यांनी मेहनत घेतली. तसेच गावातील ग्रामस्थ महिला मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत शिरगावचे माजी सरपंच विश्वनाथ सावंत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित सालेकर यांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. ग्रामविकास मंडळ शेनाळे चे अध्यक्ष अनंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र रेवाळे आबासाहेब हुलगे अनंत जाधव यांनी मार्गदर्शन केले. मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अजित लाड यांच्या हस्ते गणेश माळी व संपूर्ण चौफेर टीम चे स्वागत करण्यात आले.अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन आमच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.नाविन्यपूर्ण उपक्रमाने भरलेला कलाविष्कार २०२६ हा कार्यक्रम बहारदार असा संपन्न झाला. या कार्यक्रमातूनच मुलांचा कलात्मक आणि गुणात्मक विकास करण्यासाठी शाळेने वेगवेगळे उपक्रम आयोजित करून तालुक्यात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे व एक उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आली आहे. यासाठी सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळते त्या सर्वांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. संपूर्ण कार्यक्रमासाठी गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ, महिला मंडळ पदाधिकारी तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव, ग्रामस्थ, पालक, महीला मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते.



