Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातानंतर आणखी एक विमान क्रॅश* ...

*महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातानंतर आणखी एक विमान क्रॅश* *कोलंबियात विमानाला भीषण अपघात; खासदारासह १५ जणांचा करूण अंत*

नवीदिल्ली- महाराष्ट्रातील बारामतीमध्ये विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचदरम्यान कोलंबियामध्येही अशीच एक दुर्घटना घडली आहे. येथे एका लहान प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आणि त्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खासदार आणि आगामी निवडणुकीत उभे असलेले विधानसभेचे उमेदवार यांचा समावेश आहे. विमान लँडिंग करत असताना व्हेनेझुएलाच्या सीमेजवळ हा अपघात झाला. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हे विमान सरकारी विमान कंपनी सतेनाद्वारे चालवले जाणारे आणि एका खासगी कंपनीकडून भाड्याने घेतलेले ट्विन-प्रोपेलर बीचक्राफ्ट 1900 होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान कोलंबियाच्या सीमावर्ती शहर कुकुटा येथून काल दुपारी उड्डाणासाठी रवाना झालं होतं. विमानाला ओकाना येथे उतरणं अपेक्षित होतं. मात्र, दुपारी हवाई वाहतूक नियंत्रणाशी विमानाचा संपर्क अचानक तुटला. या विमानात 13 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. अवघ्या 23 मिनिटांचा प्रवास असलेले हे उड्डाण अखेरचं ठरलं आणि विमानातील सर्वांनीच आपला जीव गमावला. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, ‘या अपघातात विमानातील कोणीही जिवंत राहिलेलं नाही.’ मात्र, हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचं कारण तात्काळ स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अपघाताच्या चौकशीसाठी सरकारने कोलंबियन हवाई दलाला शोध आणि बचाव कार्यासाठी पाठवलं आहे. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष अँडीज पर्वतरांगांच्या पूर्वेकडील भागात सापडले आहेत. हा परिसर खडकाळ, घनदाट जंगलांनी वेढलेला असून तिथे हवामान वेगाने बदलत असल्याने बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. याशिवाय, आजूबाजूचा मोठा ग्रामीण भाग कोलंबियाच्या सर्वात मोठ्या गनिमी संघटनेपैकी एक असलेल्या नॅशनल लिबरेशन आर्मीच्या प्रभावाखाली असल्याचेही सांगण्यात येत आहे. आतापर्यंत सात मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. उत्तर सँटँडर राज्याचे गव्हर्नर विल्यम विलामिझर यांनी स्थानिक वृत्तपत्र सेमानाशी बोलताना सांगितलं की, या विमानात एक कोलंबियन खासदार आणि विधानसभेचा एक उमेदवार प्रवास करत होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोलंबियाच्या चेंबर ऑफ डेप्युटीजचे 36 वर्षीय सदस्य डायोजेनेस क्विंटेरो आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments