Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedविमान अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले?...

विमान अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात ५ मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या पोस्टने महाराष्ट्रात उडाली खळबळ

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची.. सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी आदरणीय दादांची होती, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर त्यांनी मनातली शंका व्यक्त केली. मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचं काल समजलं. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामं आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र, हे प्रश्न माझं मन विचारतंय. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का? असंही सवालही अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. तसेच एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असा प्रश्नांचा भडिमार अमोल मिटकरी यांनी केला आहे. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असंही मिटकरी यावेळी म्हणाले. दरम्यान, मिटकरी यांच्या पोस्टनंतर आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments