शालेय विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणे काळाची गरज – वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तथा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव
चिपळूण (संतोष पिलके ) : वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तथा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवळकोट ता: चिपळूण येथील जिल्हा परिषद केंद्रीय उर्दू शाळेतील सांस्कृतिक उपक्रम आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले.
शालेय विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी असे उपक्रम आयोजित करणे काळाची गरज आहे. कारण, विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असते. तसेच त्यांना विविध कला कौशल्य सादर करण्याची संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभागी होऊन स्वतःच्या कला कौशल्य सिद्ध केली पाहिजेत. म्हणूनच अभ्यासासोबत स्वता:ची कला कौशल्य विकसित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असेही आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजीम ए रहीम खान पठाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजीम पठाण, उपाध्यक्ष सुलताना ढेणकर, माजी मुख्याध्यापिका फर्जना सुर्वे, केंद्रप्रमुख अब्दुल रहूफ सुर्वे, नगरसेविका मिझबा नाखूदा, वॉईसचेअरमन जफर कट्याले, सामाजिक कार्यकर्ते सईदा शेखवारे, शाळेचे मुख्याध्यापक समर सर, नुरी हळदे मॅडम, संस्थेचे सेक्रेटरी मुजाहिद मयेर, शगुन घारे, अन्वर जबले आणि गुलजार करवले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



