श्री समर्थ कृपा विद्यालयातील विद्यार्थ्यांचे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) ऑलिम्पियाड परीक्षेत यश
खेड (संतोष पिलके ) : श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी सिल्वर झोन Artifical Intelligence ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले आहे.
यामध्ये एकूण १० विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, ४ विद्यार्थ्यांनी रौप्यपदक आणि १ विद्यार्थ्याने कांस्यपदक मिळवून शाळेचा गौरव वाढविला आहे. यामध्ये इलाफ बडे, मंजिरी चांदणे, शर्विल शशिकांत वाघ, आयेशा वागळे, अब्दुल फाकी यांनी सुवर्णपदक, स्मित महाडिक, अलिजा देसाई, अरफत चौगुले, फरहान मुरुडकर यांनी रौप्यपदक तर मोक्ष पटेल याने कांस्यपदक पटकावले. विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम, जिद्द आणि चिकाटी सर्वांना यश प्राप्त करून देण्यास उपयुक्त ठरली आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना विषय शिक्षिका कु.भक्ती घडशी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष श्री.सुयश पाष्टे, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस.अली यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



