Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंचशील क्रीडा मंडळ तीसगाव विभाग चिपळूणमध्ये माता रमाई यांची १२८ वी जयंती...

पंचशील क्रीडा मंडळ तीसगाव विभाग चिपळूणमध्ये माता रमाई यांची १२८ वी जयंती उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : पंचशील क्रीडा मंडळ तीसगाव विभाग चिपळूण यांच्यावतीने माता रमाई यांची 128 वी जयंती अध्यक्ष विशाल तुकाराम मोहिते यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सामाजिक विकास ग्रुपचे मुख्य प्रवर्तक विनेश मोहिते यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवर व उपस्थितांनी धम्मा वंदना त्रिशरण गाथा घेऊन माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाला अभिवादन केले. माता रमाई यांच्या कार्याची आणि संघर्षमय जीवन प्रवासाचा उल्लेख करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प करण्यात आला. यातून समाजात ऐक्य, समता आणि बंधुत्व याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी राजेंद्र मोहिते, मनोहर मोहिते, अंकुश गमरे, वीरेंद्र जाधव, सीमा मोहिते, प्रणाली मोहिते, कमला मोहिते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक, स्थानिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments