Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedअडरे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा गौरव  विद्यार्थ्यांना विलास पिटलेंकडून घड्याळ भेट

अडरे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा गौरव  विद्यार्थ्यांना विलास पिटलेंकडून घड्याळ भेट

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील अडरे येथील पी. के. सावंत माध्यमिक हायस्कूलचे माजी विद्यार्थी विलास रामचंद्र पिटले यांनी २५ वर्षांत तब्बल ५० लाख वाहनांची विक्री पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा शाळेत विशेष सत्कार करण्यात आला. या उल्लेखनीय यशानिमित्त त्यांनी अडरे विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वीतील १४० सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांना टायटन कंपनीची मनगटी घड्याळे भेट देत आनंदोत्सव साजरा केला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. घड्याळे हातात घेत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. मुख्याध्यापक व शिक्षकांनी श्री. पिटले यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार केला व त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले. यावेळी श्री. पिटले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्य या यशाच्या गुरुकिल्लचा असल्याचे सांगितले. ‘शाळेने दिलेली शिस्त व संस्कार यामुळेच आज मी या टप्प्यावर पोहोचलो, असे भावनिकउद्‌गार त्यांनी काढले. कार्यक्रमास मुख्याध्यापक, एस.बी. शिंदे, दत्ताराम निर्मळ, जयप्रकाश खेडेकर, ललिता पेढामकर, श्रीमती राजेशिर्के, सचिन शिंगे, श्रीमती विद्या पिटले, अमित सुर्वे, समीर शिगवण, मुन्नावर खान, माजी सैनिक नंदकुमार शिगवण, निलेश कदम, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळेत आनंदाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments