Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूण पं.स. नवनिर्वाचित सदस्य शौकत माखजनकर यांचा सावर्डे अली पब्लिक स्कूलतर्फे सत्कार*

*चिपळूण पं.स. नवनिर्वाचित सदस्य शौकत माखजनकर यांचा सावर्डे अली पब्लिक स्कूलतर्फे सत्कार*

चिपळूण (प्रतिनिधी) : सावर्डे अली पब्लिक स्कूल येथे शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभानिमित्त शौकत माखजनकर यांचा सत्कार करण्यात आला. ते नुकतेच चिपळूण पंचायत समितीवर निवडून आले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठण व नात पठणाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या वसीमा चिकटे यांनी केले. त्यांनी सत्कारमूर्तींचे कार्य व सामाजिक योगदान याची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. यावेळी अली पब्लिक स्कूल चे व्हॉइस चेअरमन चिपळूण तालुका मुस्लिम समाजचे अध्यक्ष नाझीम अफवारे, हाफिज यासीन बरमारे. माजी नगरसेवक शाबुद्दीन सुर्वे, मुराद भाई खलपे, साजिद चिकटे, अब्दुल कादिर भोंबल, मोहसीन भाई नजीर भाई चिलवान इस्लामदिन भाई भोंबळ यांसह मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना शौकत माखजनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व आपण जनतेचा सेवक म्हणून प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच शेखरजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गणाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपले सहकार्य कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांना येऊ घातलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देत त्यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून अभ्यासात सातत्य ठेवावे आणि घवघवीत यश संपादन करावे, असे प्रेरणादायी आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी अली पब्लिक सावर्डे येथील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments