Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूण नागावे येथे नेपाळी आचाऱ्याची आत्महत्या*

*चिपळूण नागावे येथे नेपाळी आचाऱ्याची आत्महत्या*

चिपळूण : तालुक्यातील नागावे येथे चायनीज दुकानात काम करणाऱ्या एका नेपाळी आचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी अलोरे–शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अर्जुन लिलाबहादूर नेपाळी (वय २८, मूळ नेपाळ, सध्या रा. नागावे) असे मृताचे नाव आहे. याबाबतची खबर विष्णू साळवी यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नागावे येथील चायनीज दुकानालगतच्या खोलीत अर्जुन नेपाळी याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे–शिरगाव पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments