Saturday, May 2, 2026
Google search engine
Homeरत्नागिरीचिपळूणजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सज्ज राहा!* *माजी आ. डॉ. विनय नातू...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सज्ज राहा!* *माजी आ. डॉ. विनय नातू , उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना*

चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बैठकांचा लावला असून नुकतेच भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी आमदार डॉ. विनय नातू, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीसाठी सज्ज रहा, असे आदेश दिले.

नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले आहे. तर आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा यशासाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी उमरोली, कळवंडे, वहाळ, सावर्डे, कोकरे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांचा आढावा घेतला. तर आता भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यालयात रत्नागिरी तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी भाजपा उपस्थित पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी निवडणुकीची व्युहरचना आखा, वातावरण निर्माण करा, यश नक्कीच मिळेल, असे आश्वासित केले.

यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, ज्येष्ठ पदाधिकारी दत्ता देसाई, रत्नागिरी दक्षिण मंडळ अध्यक्ष संयोग दळवी, रत्नागिरी उत्तर मंडल अध्यक्ष प्रतीक देसाई, रत्नागिरी उत्तर मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments