चिपळूण – चार दिवसांपूर्वी पेढे मोरेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचे सांगितल्यानंतर आज पेढे येथील तरुण कार्यकर्त्यांनी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रणजित (संदेश) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सदानंद चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे पेढे ग्रामस्थांशी अनेक वर्षांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि येथील ग्रामस्थांनी देखील ते आजवर जपले आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पेढे मोरेवाडी ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वी सदानंद चव्हाण यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यांचे अभिनंदन करून त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सदानंद चव्हाण यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षात असलेल्या शिवसैनिकांना शिवसेनेत परत येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. आज पेढे ग्रामपंचायत सदस्य रणजित मोरे यांच्यासह अनिकेत पाणकर, रुपेश बांद्रे, रोहित तांबिटकर, पार्थ मोरे, कल्पेश मोरे, आर्यन कदम, प्रेषित मोरे, आकाश जाधव, महेंद्र धाडवे, योगेश धाडवे, तेजस धाडवे, प्रमोद मोरे, तेजस जाडे, मनीष मोरे, अथर्व मोरे, दिनेश मोरे, आदेश मोरे, रोहित जाधव, राजेश मोरे, रुपेश मोरे यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी तालुका प्रमुख संदेश बापू आयरे, समन्वयक दिलीप चव्हाण, पंचायत समितीचे माजी गटनेते राकेश शिंदे, चिपळूण नगरपरिषदेचे गटनेते अंकुश आवले, विभागप्रमुख अजय कदम, विभाग संघटक जनार्दन मालवणकर, अनिल शिंदे, दयानंद जुवळे, पुष्कर चव्हाण, युवासेनेचे सुचय शिंदे, अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते.
या तरुणांच्या शिवसेना प्रवेशामुळे पेढे गावातील शिवसेना अधिक मजबूत झाली आहे. पक्ष वाढीसाठी जी जबाबदारी मिळेल ती पार पाडू असा विश्वास रणजित मोरे यांनी व्यक्त केला. सदानंद चव्हाण यांनी या सर्वांना शुभेच्छा दिल्या तर पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.
पेढेतील तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
RELATED ARTICLES



