Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे अध्यक्ष कोकण आयडॉल संजय शिर्के यांना राष्ट्रीय...

*रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे अध्यक्ष कोकण आयडॉल संजय शिर्के यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

चिपळूण (राज पिलके ):- रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे मा. अध्यक्ष तथा कोकण आयडॉल संजय शिर्के यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “शिक्षण विकासासाठी उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार” प्रदान करून गौरवण्यात आले.

आर्थिक व सामाजिक विकास प्रतिष्ठान, नवी दिल्ली (Economic and Social Development Foundation) यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. आपल्या देशातील खेडी समृद्ध झाली तर देशही आपोआप समृद्ध होईल हा दृष्टीकोन समोर ठेवून ग्रामीण भागातील युवकास रोजगार निर्मिती करून स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी समताधिष्ठित व्यावसायिक शिक्षण प्रणालीचा संजय शिर्के यांनी प्रारंभ केला. आजमितीस हजारो विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची रिगल भरारी घेत आहेत. या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले अनमोल कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे.

हा सर्वोच्च सन्मान सोहळा नुकताच देशाची राजधानी नवी दिल्ली येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात एच. एस. रावत यांच्या शुभहस्ते संजय शिर्के यांना उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सन्मानामुळे रिगलरुपी कोकण विभागाच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून असंख्य कुटुंबांचा ‘आधारवड’ म्हणून संजय शिर्के यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल यशवंत शिक्षण संस्था भोम व रिगल एज्युकेशन सोसायटीच्या मा. संचालिका डॉ. सुमिता शिर्के, सचिव मा. प्रशांत शिर्के, सर्व संचालक मंडळ, सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक, शिक्षणप्रेमी, मित्रपरिवार यांच्या वतीने अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. रिगलचे कार्य हे समाजबांधणीसाठी कौतुकास्पद आहे. हे राष्ट्रीय स्तरावर देखील गौरवले गेले आहे, हे कोकणवासियांसाठी अभिमानास्पद आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments