Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*कोकणच्या आरोग्यासाठी ठोस पाऊल; कॅन्सर डिटेक्शन सेंटरला मान्यता व कॅन्सर व्हॅन वाढवण्याची...

*कोकणच्या आरोग्यासाठी ठोस पाऊल; कॅन्सर डिटेक्शन सेंटरला मान्यता व कॅन्सर व्हॅन वाढवण्याची मागणी* *आ. शेखर निकम यांनी अधिवेशनाचे वेधले लक्ष*

चिपळूण (प्रतिनिधी) : अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५-२६ दरम्यान कोकणाच्या आरोग्य सुविधांबाबत अत्यंत महत्त्वाचा आ. शेखर निकम यांनी मुद्दा मांडून अधिवेशनाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये नवीन हॉस्पिटल उभारणीबरोबरच कोकणावर प्रेम करणाऱ्या नेतृत्वाकडून ग्रामीण रुग्णांना अधिक सक्षम आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल निदान आणि संशोधन केंद्र मार्फत चालवल्या जाणाऱ्या अत्याधुनिक कॅन्सर डिटेक्शन सेंटरला शासनाचे अधिकृत रेफरिंग सेंटर म्हणून मान्यता द्यावी, अशी ठोस मागणी यावेळी केली.
यानुसार या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असून ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा लाभ होऊ शकतो. शासनाने जर अधिकृत मान्यता दिली, तर हजारो कुटुंबांना वेळेवर तपासणी व उपचाराची संधी मिळेल हीच या मागणीमागची भावना होती. तसेच पूर्वी देण्यात आलेल्या कॅन्सर तपासणी वॅन जिल्ह्यात सध्या दिसत नसल्याने त्यांची पूर्तता करावी व राज्यभर अशा व्हॅनची संख्या वाढवावी, अशीही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. राज्यभर कॅन्सर व्हॅनची संख्या अपुरी असल्याने त्या वाढवण्याबाबत विचारविनिमय करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments