चिपळूण (वार्ताहर) : संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजीत शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२६ “सन्मान निष्ठेचा, गौरव कर्तुत्वाचा” नुकताच झाला. यावेळी डॉ. चंद्रकांत खोपडकर यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कर्तुत्वाच्या पंखांना लढण्याची उमेद देणाऱ्या या गौरव सोहळ्यास अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिर सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी खोपडकर नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा पुरस्कार माजी मंत्री बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सह. सा. का. लि. चे चेअरमन विवेकाभैय्या कोल्हे, खा. भाऊसाहेब वाकचौरे आदी मन्यवर उपस्थित होते. डॉ. खोपडकर यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*डॉ. चंद्रकांत खोपडकर यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान*
RELATED ARTICLES



