स्टार हेल्थ इन्शुरन्स चिपळूण शाखेची विक्रमी कामगिरी ; नूतन कार्यालयाचे आज उदघाट्न
स्टार हेल्थ इन्शुरन्सचे कार्यालय सहा वर्षांपूर्वी सुरू झाले आणि या कालावधीत कंपनीने वार्षिक काही कोटींची व्यवसायिक उलाढाल करून विक्रमी कामगिरी करून दाखवली यानिमित्त राजसत्ता टीमने या कार्यालयाच्या कामगिरीचा घेतलेला आढावा………!!
सहा वर्षांपूर्वी चिपळूणमध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स कार्यालयाची सुरुवात 31 मे 2020 रोजी झाली. शाकाधिकारी शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली शाखेची घोडदौड सुरू असताना सुरुवातीला 30 ते 40 एजंटांच्या माध्यमातून
वार्षिक साडेचार ते पाच लाख व्यवसाय सुरुवात झाली.आज तीच वार्षिक उलाढाल पाच कोटींच्या आसपास पोहचली आहे. या स्टार हेल्थ इन्शुरन्स चा नूतन कार्यालयाचे उदघाटन आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी ट्रेड सेंटर दुसरा मजला स्टेट बँक शेजारी मोबाईल टेक्नॉलॉजी अनिता पान शॉप च्या वरती चिंचनाका चिपळूण या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता होत आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री विजय अरोरा स्टार हेल्थ कंपनीचे बिझनेस हेड पुणे, तसेच श्री उमेश सपकाळ नगराध्यक्ष चिपळूण,श्री संजय कनोजे स्टार हेल्थ विभागीय कार्यालय प्रमुख सातारा विभाग व श्रीकांत पिसाळ स्टार हेल्थ कंपनी सातारा विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्टार हेल्थ इन्शुरन्सची वाढती लोकप्रियता आणि चिपळूण कार्यालयांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील तालुके व येथे कार्यरत असणारे विकास अधिकारी आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून संस्थेने गगन भरारी घेतल्याचे दिसून आले. अवघ्या सहा वर्षांमध्ये पाच लाखांच्या वार्षिक उलाढाली पासून वार्षिक पावणे पाच कोटींची व्यवसायिक उलाढाल स्टार हेल्थ इन्शुरन्स चिपळूण कार्यालयाने केली.पुणे केंद्र अंतर्गत सातारा विभागामध्ये झपाट्याने व्यावसायिक विक्रमी उडदोड करून उज्ज्वल करणारी शाखा म्हणून चिपळूणने नावलौकिक मिळवला.केवळ व्यवसायिक उलाढालचं नव्हे तर या कार्यालयातून नवीन आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान एक कोटी 57 लाख 90 हजार 665 रुपयांची भरपाई देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक विभाग प्रमुख शैलेश शिर्के यांनी दिली आहे.
सातारा विभागामध्ये
कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या अंतर्गत चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड,गुहागर व संगमेश्वर असे सहा तालुके कार्यरत आहेत. या संपूर्ण तालुक्यांमध्ये साडेचारशे विमा प्रतिनिधी काम करत आहेत. या सर्वांकडून कामगिरी करून घेणारे मुख्य विक्री व्यवस्थापक महेंद्र पवार, उदय मनवे आणि विक्री व्यवस्थापक गणेश धुरी राजेंद्र ठसाळे हे कंपनीसाठी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या सर्वांना कार्यालयातून भक्कम साथ देणारे शाखाधिकारी शैलेश शिर्के व वरिष्ट प्रतिनिधी शेखर घडशी यांचे विशेष योगदान पाहायला मिळते.



