रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी, शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त तीन स्थानिक सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले असून, त्या अधिकारांचा वापर करत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सन २०२६ या वर्षासाठी तीन सुट्ट्या घोषित केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, होळी सणानिमित्त सोमवार, २ मार्च २०२६, अनंत चतुर्दशीनिमित्त शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ आणि धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना स्थानिक सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. या तीनही सुट्ट्या रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व कार्यालयांना लागू राहतील, अशी माहिती अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.
*रत्नागिरीत तीन स्थानिक सार्वजनिक सुट्ट्या जाहीर* *होळी, अनंतचतुर्दशी व धनत्रयोदशीला शासकीय कार्यालयांना सुट्टी*
RELATED ARTICLES



