Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*खेंड विभागात कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थिनी थोडक्यात बचावली*

*खेंड विभागात कुत्र्यांच्या हल्ल्यात विद्यार्थिनी थोडक्यात बचावली*

आज सकाळी ७:३० वा परांजपे हायस्कूलची विद्यार्थिनी कुत्रांच्या हल्ल्यात नशिबाने बचावली.
खेंड संसारे नाका येथे बेकायदेशीर पणे वास्तव्य करणारी मंज्या कांबळी नामक महिलेने २० – २५ कुत्रे पाळली असून रोज जाणाऱ्या येणाऱ्या महिला, विद्यार्थ्यांच्या अंगावर जाऊन चावण्याचा प्रयत्न करतात. गेले अनेक दिवस स्थानिक नागरिक ही गोष्ट सहन करीत आहेत.
आज सकाळी परांजपे हायस्कूलची विद्यार्थिनी शाळेत जात असताना त्यातील कुत्र्यांनी त्या १० वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला. नशिबाने ४ – ५ व्यक्तींनी मध्ये पडून त्या मुलीला वाचविले, नाहीतर त्या मुलीचे चावा घेऊन लचके काढले असते.
कृपया नगर पालिका, पोलिस प्रशासन, नगराध्यक्ष, स्थानिक नगरसेवक यांनी यात लक्ष घालून त्या अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या महिलेच व २० – २५ कुत्र्यांपासून येथील नागरिकांचं रक्षण करावं, अशी येथील नागरिकांची आग्रहाची मागणी आहे नाहीतर आंदोलनाचा तयारीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments