Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री स्वामी सेवामार्गातर्फे श्रीक्षेत्र उज्जैन येथे ५ जानेवारीला ऐतिहासिक अतिउच्च भस्म लिंगार्चन...

श्री स्वामी सेवामार्गातर्फे श्रीक्षेत्र उज्जैन येथे ५ जानेवारीला ऐतिहासिक अतिउच्च भस्म लिंगार्चन सोहळा


नाशिक (प्रतिनिधी): अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत श्री क्षेत्र उज्जैन येथे श्री महाकालेश्वरच्या चरणी दि.५ जानेवारी २०२६ रोजी ऐतिहासिक भस्म लिंगार्चन सोहळा राष्ट्र आणि सकल समाज हितासाठी आयोजित करण्यात आला आहे. या अतिउच्च आध्यात्मिक सेवेमुळे सेवेकऱ्यांमध्ये अपूर्व उत्साह निर्माण झाला आहे.

गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण सोहळ्याचे नीटनेटके नियोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य अतिउच्च सेवेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण देशभरातून येणारे लाखो सेवेकरी एकाच वेळी बसून सामूहिक स्वरूपात भस्म लिंगार्चन सोहळ्यात सहभागी होतील असे नियोजन करण्यात आले आहे.उज्जैन नगरी ही सप्त मोक्षपुरींपैकी एक आहे. हे शक्तिपीठ देखील आहे.काळाचे काळ महाकाळ येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात भक्तांचे कल्याण व रक्षण करतात. शिवाय महाकुंभपर्व म्हणून या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे न भूतो न भविष्यती होणाऱ्या या ऐतिहासिक भस्म लिंगार्चन सोहळ्यात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

५ जानेवारीला भस्म लिंगार्चन सोहळा

श्रीक्षेत्र उज्जैन येथील बडनगर रोड पंचायती आखाडा श्री निरंजनी या ठिकाणी श्री महाकालाच्या चरणी सामूहिक सेवा रुजू केली जाणार आहे. ५ जानेवारीला सकाळी आठ वाजता भूपाळी आरती त्यानंतर प्रधान संकल्प होऊन सकाळी ८ ते १०:२० या वेळेत ऐतिहासिक भस्म लिंगार्चन सोहळा होईल. सकाळी १०:३० च्या नैवेद्य आरतीनंतर परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांचे प्रासादिक हितगुज व त्यानंतर सेवेकऱ्यांना प्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

४ जानेवारीला मंगळ पूजन विधी

पत्रिकेत मंगळ दोष असल्यास श्री क्षेत्र उज्जैन येथे मंगळ पूजन विधी करण्याचा उपाय सांगण्यात आला आहे. त्यामुळे भस्म लिंगार्चन सोहळ्यानिमित्ताने ४ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता कार्यक्रमस्थळी मंगळ ग्रह अनुष्ठान पूजन होणार आहे. या विशेष अनुष्ठानचा सेवेकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments