Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपळी पुलाचे काम ७ जानेवारी ला सुरु होणार ; उद्योग मंत्री उदय...

पिंपळी पुलाचे काम ७ जानेवारी ला सुरु होणार ; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

चिपळूण (राज पिलके ) : बुधवार दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता पिंपळी येथील या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ऐन पावसाळ्यात गणेशोत्सवाच्या काळात दसपटी विभाग आणि गाणे खडपोली एमआयडीसी यांना चिपळूणशी जोडणारा महत्वाचा असा पिंपळी येथील पूल अचानक कोसळला.त्यानंतर गेले पाच सहा महिने या भागातील ग्रामस्थांना तसेच सर्वांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे तर दुसरीकडे या भागातील एमआयडीसी मधील कारखानदारांना देखील मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे.या पुलाची पुनर्बांधणी लवकर व्हावी यासाठी श्री.सदानंद नारायण चव्हाण
शिवसेना उपनेते,माजी आमदार हे सहकाऱ्यांसह राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.ना.सामंत यांनी या कामासाठी तातडीने निधी मंजूर केला.काही प्रशासकीय बाबींमुळे या कामाला थोडा विलंब झाला आहे ही वस्तुस्थिती आहे.मात्र पावसाळ्यापूर्वी आपण सर्वजण या त्रासातून मुक्त होऊ असा विश्वास यनिमित्ताने श्री.सदानंद नारायण चव्हाण
शिवसेना उपनेते,माजी आमदार यांनी दिला आहे . बुधवार दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता पिंपळी येथील या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments