Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized५ मार्च रोजी डीबीजे महाविद्यालयात युवा संसद भरणार

५ मार्च रोजी डीबीजे महाविद्यालयात युवा संसद भरणार

चिपळूण (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने विकसित केलेल्या भारत युवा संसद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १८ ते २५ वयोगटातील तरुण ५ मार्च रोजी आयोजीत करण्यात आले आहे “50 years of Emergency : Lessons for Indian Democracy. “आणीबाणीची ५० वर्षे: भारतीय लोकशाहीसाठी बोध” या विषयावर डी.बी.जे. महाविद्यालयामध्ये आयोजीत करण्यात आली आहे. हा कार्यक्रम जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला जाईल असे या सहभागींपैकी, ५ स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीन स्पर्धकांची निवड केली जाईल. लोकसभा संसद, नवी दिल्ली येथे या तीन स्पर्धकांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि समाजातील इतर प्रतिष्ठित सदस्य सर्व स्तरांवर निवड प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. विकासित भारत राष्ट्रीय युवा संसद २०२६ आयोजनासाठी मुंबई विद्यापीठातर्फे रत्नागिरी जिल्ह्यांसाठी डी.बी.जे. महाविद्यालयाची नोडल महाविद्यालय म्हणून निवड आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये जिल्हा रत्नागिरी मधील सर्व महाविद्यालय तसेच विविध क्षेत्रातील युवा संघटना सहभागी होणार आहेत. स्थानिक लोक प्रतीनिधी, नवकोंकन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, सेक्रेटरी अतुल चितळे आणि प्राचार्य डॉ. माधव बापट, पत्रकार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments