Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसावर्डेतील अनोखी “व्हलटे होम” परंपरा | पेटत्या लाकडांचा थरारक सोहळा

सावर्डेतील अनोखी “व्हलटे होम” परंपरा | पेटत्या लाकडांचा थरारक सोहळा

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे गावातील “व्हलटे होम” ही एक आगळीवेगळी आणि पारंपरिक परंपरा म्हणून प्रसिद्ध आहे. या सोहळ्यात गावातील दोन गट समोरासमोर येतात. होमातील पेटती लाकडं हातात घेतली जातात आणि प्रतीकात्मक स्वरूपात एकमेकांकडे फेकली जातात. या परंपरेत उत्साह, शौर्य आणि पारंपरिक जोश यांचा संगम पाहायला मिळतो. ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भारलेले असते. मानपानाप्रमाणे घोषणा दिल्या जातात, बोंबा मारल्या जातात आणि दोन्ही गट समोरासमोर उभे ठाकतात. विशेष म्हणजे, ही परंपरा वर्षानुवर्षे जपली जात असली तरी सुरक्षिततेची काळजी घेतली जाते आणि कोणालाही इजा होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. यामध्ये कुणीही जखमी होत नाही हे विशेष! सावर्डे गावाने आपली ही अनोखी परंपरा आजही जपली असून ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments