चिपळूण (संतोष पिलके ) : महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी चिपळूण शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या महास्वच्छता अभियानामध्ये श्री सदस्य,चिपळूण शहर व परिसरातील नागरिक तसेच सेवाभावी संस्था सहभागी झाले होते.यावेळी एकूण ५५० श्रीसदस्य यांनी आठ वाहने घेऊन ३९५५ किलो ओला कचरा,५४६७ किलो सुका कचरा असा सर्व मिळून ९४२२ किलो कचरा गोळा केला. यावेळी चिपळूण नगराध्यक्ष उमेश सपकाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नगरपालिका मुख्याधिकारी संजय जाधव तसेच सर्व नगरसेवक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाबाबत कौतुक करून समाजामध्ये अशा स्वरूपाच्या कामगिरीची गरज असल्याचे यावेळी सांगितले.महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सातत्याने समाजपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात.त्यात प्रामुख्याने वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर,दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप,अंध व मुकबधीर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, पाणपोई, बस थांबे, अपघातग्रस्तांना मदत, या सारखे अनेक उपक्रम महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविले जातात.

रविवार दि. १ मार्च रोजी चिपळूण शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पदमश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.या स्वच्छता अभियानामध्ये चिपळूण शहर व परिसरातील प्रांत कार्यालय परिसर, पोलीस स्टेशन कार्यालय परिसर,तहसिल कार्यालय परिसर,पंचायत समिती परिसर,नगरपालिका चिपळूण परिसर,आयजी चौपाटी,चिपळूण आगार / बसडेपो, न्यायालय चिपळूण खेंड चौकी ते नगरपालिका चिपळूण,गणेश मंदिर ते भेंडी नाका,भेंडी नाका ते चिपळूण नगरपरिषद,पॉवर हाऊस ते चिंच नाका,वेस मारुती मंदिर ते खेडेकर संकुल,गुहागर बायपास ते नगरपालिका चिपळूण आदि संपूर्ण शहरातील भागांमध्ये श्री बैठक धामनंद वावे,श्री बैठक चिपळूण मंगळवार,श्री बैठक धामनंद वावे,श्री बैठक पाचाड,श्री बैठक लवेल मंगळवार,श्री बैठक चिपळूण मंगळवार,श्री बैठक कान्हे सोमवार,श्री बैठक चिपळूण सोमवार,श्री बैठक कान्हे सोमवार,श्री बैठक पाचाड,श्री बैठक सावर्डा,श्री बैठक चिपळूण मंगळवार,श्री बैठक अलोरे,श्री बैठक लवेल मंगळवार इत्यादी ठिकाणच्या एकूण ५५० श्री सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.



