Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedइराण–अमेरिका-इस्त्राइल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा : आ. शेखर निकम

इराण–अमेरिका-इस्त्राइल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा : आ. शेखर निकम

चिपळूण (प्रतिनिधी) : इराण विरुद्ध अमेरिका–इस्त्राइल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या किंवा अडचणीत असलेल्या भारतीय नागरिकांनी तात्काळ प्रशासनाने जाहीर केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी केले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपल्या कुटुंबीयांना नियमितपणे आपल्या सुरक्षिततेची माहिती देत राहावे, असेही त्यांनी सांगितले आहे. आपत्कालीन मदत, स्थलांतर व्यवस्था किंवा इतर आवश्यक सहाय्य मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. “नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे,” असे सांगत परदेशात असलेल्या भारतीयांनी सतर्क राहण्याचे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments