Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोवळकोट येथे श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाची शेरणे काढण्याच्या सोहळ्याने सांगता

गोवळकोट येथे श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाची शेरणे काढण्याच्या सोहळ्याने सांगता

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाची सांगता पारंपरिक शेरणे काढण्याच्या सोहळ्याने उत्साहात झाली. भाविकांनी आपले नवस पूर्ण व्हावेत या श्रद्धेने पेठमाप भाटण येथे शेरणे लपवून ठेवण्याची परंपरा आहे. यंदा भाविकांनी एकूण १२३ शेरणे ठेवली होती. त्यापैकी ४४ शेरणे करंजेश्वराने शोधल्याचे मानले जाते. सोमवारी सायंकाळी पेठमाप येथील भव्य मैदानावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात हा पारंपरिक कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेला हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments