चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील वाघिवरे सहाणेवर दोन ग्रामदेवतांचा पालखी भेट सोहळा पार पडला. यामध्ये बामणोली येथील श्री वाघेश्वरी ग्रामदेवता ही वाघिवरे ग्रामदेवता चंडकाई कालकाई या देवीला भेटण्यासाठी वाघिवरे सहाणेवरती गेली. त्यानंतर हा नेत्र दीपक सोहळा संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे धुलीवंदन या दिवशी या दोन ग्रामदेवतांचा भेट सोहळा होत असतो. याहीवर्षी हा पालखी भेट सोहळा पार पडला. यासाठी वाघिवरे येथे जय्यत तयारी करण्यात आली होती . सायंकाळी चार वाजता ढोलताशा आणि खालुबाजाच्या गजरात वाजत गाजत बामणोली येथील ग्रामदेवतेचे आगमन वाघिवरे येथे झाले. त्यानंतर वाघिवरे ग्रामदेवता सुद्धा देवाच्या मांडवातून उठून या देवीचे स्वागत करण्यासाठी दोन पावले पुढे आली. वाघिवरे सहाणेवरती दोन्ही पालख्या आल्यानंतर दोन्ही पालकांनी सहाणे वाटली प्रदक्षिणा घातल्यानंतर हा पालखी भेट सोहळा पार पडला. दोन्ही बहिणी एकमेकींना भेटल्या. त्यांची गळाभेट झाली. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम झाला. यामध्ये ढोल वादन खालुबाजा वादन यांच्या वादनामुळे वातावरण एकदम जल्लोषमय झाले होते. दोन्ही पालख्या सहाणे वरती विराजमान झाल्या नंतर भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर पुनश्च एकदा गळाभेट होऊन या बामणोली येथील ग्रामदेवता आपल्या मार्गाकडे प्रस्थान झाली. या कार्यक्रमासाठी पुणे, मुंबई आणि पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.
*वाघिवरे सहाणेवरती झाली दोन बहिणींची गळा भेट* *पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी*
RELATED ARTICLES



