*चिपळूण (संतोष पिलके)-* रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) जिल्हा परिषद गटनेतेपदी प्रमोद अधटराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रमोद अधटराव हे संगमेश्वर तालुक्यातील कोसु़ंब जि. प. गटातून विजयी झाले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे ४ सदस्य विजयी झाले आहेत. या नवनिर्वाचित सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी नुकतीच चिपळूण येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सर्व संमतीने कोसुंब जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले श्री. प्रमोद अधटराव यांच्या नावावर गट नेते पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रमोद अधटराव यांची निवड झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत भाजपची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.



