Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedएस.टी बसची दुचाकीला जोरदार धडक मालघर येथील घटना, अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

एस.टी बसची दुचाकीला जोरदार धडक मालघर येथील घटना, अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील मालघर महाडिकवाडी येथे एस.टी बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एस. टी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद रविंद्र झिमा माटे (वय ५०, रा. सदिच्छा निवास, खेन्ड कांगणेवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. त्यांचा भाचा विठ्ठल वसंत पंदेरे (वय ४०, रा. कापसाळ डिगेवाडी, ता. चिपळूण) हा त्याच्या ताब्यातील यामाहा एफझेड मोटारसायकल (क्र. MH 08 AT 0350) घेऊन रामपूर येथून चिपळूणच्या दिशेने गुहागर–चिपळूण मार्गावरून जात होता. दरम्यान, मालघर महाडिकवाडी येथील वळणावर चिपळूण बाजूकडून येणाऱ्या एस.टी. बस (क्र. MH 14 BT 2662) च्या चालकाने रस्ता वळणाचा असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून भरधाव व हायगईने बस चालवून विरुद्ध दिशेने येत समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विठ्ठल पंदेरे याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित बस चालक अमोल मोहन कांबळे (वय ३५, रा. गुहागर, एस.टी. डेपो) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments