Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अपरान्त मल्टिपेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर* *महिलांच्या आरोग्य...

*आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अपरान्त मल्टिपेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर* *महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी उपक्रम; मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग*

चिपळूण (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून चिपळूण येथील अपरान्त मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सोमवार दिनांक ९ मार्च रोजी महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराला चिपळूण शहर व परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर आणि ईसीजी यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्यांचा समावेश होता. तसेच महिलांच्या पोषण स्थितीचे आणि हाडांच्या आरोग्याचे मूल्यमापन करण्यासाठी बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) आणि बीएमडी (बोन मिनरल डेन्सिटी) या विशेष चाचण्याही करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांना सामान्य आरोग्य, स्त्रीरोग, आहार, व्यायाम आणि जीवनशैली व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राची हरवंदे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रेहमत जबले.सौ.माधवी जाधव( संरक्षण अधिकारी, चिपळूण).भाजप जिल्हा सदस्या सौ. स्वाती देवळेकर, माजी नगराध्यक्षा. सौ. सावित्री होमकळस.आदि मान्यवर उपस्थित होते. याशिवाय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर डॉ. मनीषा वाघमारे, आयएमए चिपळूणच्या उपाध्यक्षा डॉ. वनिता सानप, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीश भास्करवार, डॉ. शशिकांत गायकवाड, डॉ. सदगुरू पाटणकर आणि डॉ. भक्ती पलांडे. आहारतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित तपासणी, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली या गोष्टी महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला विशेष भेट देत आमदार पत्नी तसेच नुकत्याच सार्वडा येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या सौ. पूजा निकम यांनी शिबिराला भेट दिली. त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. तसेच समाजाच्या सर्व आरोग्य रक्षणासाठी कार्यरत असलेल्या वैद्यकीय पथकाच्या सेवाभावाचे कौतुक केले. “एक निरोगी महिला ही निरोगी कुटुंबाचा आणि सुदृढ समाजाचा पाया असते,” असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवर व नागरिकांनी अपरान्त हॉस्पिटल तर्फे आयोजित या उपक्रमाबाबत येथील कार्यक्षम कर्मचारी वर्ग व सुयोग्य नियोजना बद्दल फार कौतुक केले भविष्यातही समाजहितासाठी अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments