चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाच्या आदर्श विद्यामंदिर, चिवेली या विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी, वन परीक्षेत्र सामाजिक वनीकरण चिपळूण यांच्यावतीने (EEP) राष्ट्रीय हरित सेना योजनेअंतर्गत ‘प्लास्टिक चा कमीत कमी वापर! ‘या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी सामाजिक वनीकरण परीक्षेत्र चिपळूणचे वन क्षेत्रपाल आर.एस. परदेशी, वनरक्षक अर्जुन जाधव, विभाग प्रमुख वनरक्षक समृद्धी अतकरी आदी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे कार्यवाह रवींद्र शिर्के, संस्थेचे सल्लागार अशोक वनगे, शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन संतोष कुळे, कार्यकारणी सदस्य राजेंद्र मेढेकर, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक नितीन गुरव, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक अर्जुन जाधव यांनी विद्यार्थ्यांना ‘प्लास्टिक चा कमीत कमी वापर’ या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. प्रभारी मुख्याध्यापक नितीन गुरव यांनी ही मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यशाळेचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी विद्यालयातील हरीत सेना विभाग प्रमुख शैलेश आंब्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रियाज अत्तार यांनी केले.
*चिवेली विद्यालयात ‘प्लास्टिक’ मुक्ती कार्यशाळा*
RELATED ARTICLES



