Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रेमसंबंधाच्या संशयावरून खून; सहा संशयित महिलांची निर्दोष मुक्तता

प्रेमसंबंधाच्या संशयावरून खून; सहा संशयित महिलांची निर्दोष मुक्तता

खेड:- मंडणगड तालुक्यातील दहिंबे येथे प्रेमसंबंधाच्या संशयावरून झालेल्या रेखा लक्ष्मण मुकना यांच्या खून खटल्याचा निकाल लागला असून, जिल्हा न्यायाधीश-१ यांनी या प्रकरणातील सहा महिला आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांमधील विसंगती आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला.

​२२ मे २०१८ रोजी मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिंबे आदिवासीवाडी येथे ही घटना घडली होती. मयत रेखा मुकना यांचे आरोपी संगीता जाधव हिचे पती शांताराम जाधव यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. या रागातून सहा महिलांनी रेखा यांच्या घरात घुसून त्यांना लाठी-काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली होती, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रेखा यांची आई निशा नितीन मोरे यांनी फिर्याद दिली होती.

​न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या महिलांमध्ये संगीता शांताराम जाधव, शोभा सुरेश मुकना, चांद्री सहदेव मुकना, योगिता योगेश जाधव, वत्सला शंकर जाधव आणि भागी प्रकाश मुकना (सर्व रा. दहिंबे आदिवासीवाडी) यांचा समावेश आहे.

​या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. अश्विन भोसले यांनी साक्षीदारांच्या उलटतपासणीत अनेक महत्त्वाच्या विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. घटनेवेळचे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातील तफावत पाहता, आरोपींवरील खुनाचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही.

न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व सहा महिलांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. या खटल्यात अ‍ॅड. अश्विन भोसले यांना अ‍ॅड. सिद्धी खेडेकर, अ‍ॅड. प्रिती भेकरे आणि अ‍ॅड. अंकिता भेकरे यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments