Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*प्रविण कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश*

*प्रविण कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश*

मंडणगड प्रतिनिधी दि. 04 – भारतीय जनता पार्टीचे मंडणगड तालुका अध्यक्ष प्रविण कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह 4 जानेवारी 2026 रोजी रोहा सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पाटीत (अजीत पवार) जाहीर प्रवेश केला. यावेळी पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम मारुती कदम, चंद्रकांत जाधव, नामदेव कदम,कृष्णा महाडिक, सुनिल पारेख, बाळाराम सकपाळ, रमेश कदम, अमोल कदम, प्रमोद कदम, अनिल विलेकर, अनिल राणे, विनायक मोरे,लियाकत मुंगरूस्कर, गणेश सुतार, संतोष मोरे,प्रशांत कदम व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. स्थानीक स्वराज संस्थाचे निवडणुकांचे बिगुल अद्याप वाजलेले नसले तरी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये स्वबळाचे संकेत या आधीच दिले आहेत. स्थानीक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महायुतीत समावेश नसण्या बाबत या आधीच पुरेशी स्पष्टता आलेली आहे. गेल्या दोन महिन्यापांसून पडद्यामागे सुरु असलेल्या घडामोडींचे अवलकोन करता पार्टीने तालुक्यात आपला कार्यकर्ता व मतदाता यांचा बेस वाढविला आहे पार्टीचे जुन्या नव्या कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण केले जात असून नाराजांची नाराजी दूर केली जात आहे अन्य पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात आणण्याकडेही पार्टीने लक्ष दिले आहे याचबरोबर महाविकास आघाडीत चौथा पक्ष म्हणून सहभागी होत मतदार संघात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या पक्षासमोर निवडणुकीत मोठे आव्हान उभे करण्याचे दृष्टीने स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यामुळे मध्यतरी पक्षास आलेली मरगळ या निमीत्ताने दुर झालेली दिसून आली आहे. श्री. कदम हे लाटवण पंचक्रोशीतील पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असून 2014 साली झालेल्या स्थानीक स्वराज संस्थाचे निवडणुकीत पार्टीने तिकट नाकारल्याने श्री. कदम यांनी भारतीय जनता पार्टीचे तिकटीवर भिंगळोली पंचायत समिती गणातून उभे राहून ती निवडणुक लढवली होती व गेल्या दोन वर्षापासून निवडणुक लढविण्यासाठी आवश्यक असणारी मोर्चे बांधणी त्यांनी केलेली आहे. श्री. कदम यांनी (4) रोजी केलेला त्यांचा पक्ष प्रवेश हा एका अर्थाने अकरा वर्षानंतर केलेली घरवापसी ठरला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments