चिपळूण (राज पिलके ) : श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेचे चिपळूण शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांची आई सौ. शिल्पा जागुष्टे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख श्री. शाळीग्राम (राजू) विखारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण शहर प्रमुख श्री. सचिन (भैया) कदम, नगरसेवक श्री. संजय गोताड,
चिपळूण युवासेना शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे, चिपळूण शहर सचिव श्री. प्रशांत मुळये, विभाग प्रमुख श्री. मनोज पांचाळ व श्री. शैलेश जागुष्टे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
तसेच चिपळूण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सौ. शिल्पा जागुष्टे व श्री. राजू विखारे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्या कार्यातून नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



