Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमंदार महोत्सव युवा उर्जा २०२६ उत्साहात

मंदार महोत्सव युवा उर्जा २०२६ उत्साहात

 

चिपळूण (प्रतिनिधी) : मंदार एज्युकेशन सोसायटी, पेढांबे यांच्या वतीने दरवर्षी साजरा होणारा मंदार महोत्सव युवा उर्जा २०२६ दि. २ जानेवारी ते दि. ४ जानेवारी दरम्यान उत्साहात पार पडला. दि. ०२ जानेवारी रोजी अलोरे -शिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे चेअरमन मंदार राजाराम शिंदे, संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती शैलजा राजाराम शिंदे, कुंभार्ली गावचे उपसरपंच संदीप कोलगे, पेढांबे गावच्या सरपंच सौ. विनया पेढांबकर, पेढांबे गावचे सुपुत्र जयवंत शिंदे, संस्थेच्या विश्वस्त आणि मंदार महोत्सवच्या अध्यक्षा सौ. मिताली मंदार शिंदे, संस्थेच्या विश्वस्त श्रीमती सुवर्णा पाटणकर, सौ समिरा अभिजित चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवामध्ये संस्थेच्या अंतर्गत असलेल्या स्कूल आणि सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इंग्लिश मेडीयम स्कूलने सादर केलेले कालीनृत्य, पॉलीटेक्निक कॉलेजने सादर केलेले अघोरी नृत्य आणि सिनिअर कॉलेजने सादर केलेले कारगिल युद्धावर आधारित नृत्य या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवामध्ये सगळ्यात दमदार आणि सगळ्यांच्या काळजाला भिडणारे माहिती सफाई कर्मचाऱ्यांनी संस्थापक कै. राजाराम केशवराव शिंदे यांच्या शैक्षणिक जीवन प्रवासावर आधारित केलेल्या नृत्त्याचे विशेष कौतुक झाले. या नृत्त्याने संस्थेचे चेअरमन भावूक झाले त्यांनी सफाई महिला कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन केले. दि. ०४ जानेवारी रोजी म्हणजेच शेवटच्या दिवशी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते’ या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्री “अश्विनी महांगडे” या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. त्यांच्या हस्ते विविध मैदानी खेळांमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अश्विनी महांगडे यांनी आपल्या मनोगतात “स्व. राजाराम शिंदे यांच्या नाट्यमंदार या संस्थेच्या नाटकातून माझी कारकीर्द सुरु झाली” अशी कबुली दिली. हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागातील प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments