Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपन्हाळजे मध्ये बीएसएनएल व जिओ नेटवर्कचे तीन तेरा ; माजी ग्रामपंचायत सदस्य...

पन्हाळजे मध्ये बीएसएनएल व जिओ नेटवर्कचे तीन तेरा ; माजी ग्रामपंचायत सदस्य आदिल सदगुरो यांचा आंदोलनाचा इशारा

खेड : तालुक्यातील पन्हाळजे या ठिकाणी बीएसएनएल आणि जिओ कंपनीच्या नेटवर्क सेवेचे तीन तेरा वाजले असून सातत्याने येथील नागरिकांना खंडित सेवेचा फटका बसत असल्यामुळे प्रचंड नाराजी या परिसरामध्ये पसरली आहे. पन्हाळजे गावामध्ये खेड तालुक्यातील सर्वात मोठे विध्यार्थ्यांचे वस्तीगृह असून येथे १६० विद्यार्थी वस्तीला आहेत. घरापासून दूर असलेल्या या विद्यार्थ्यांना बीएसएनएल व जिओच्या खंडित सेवेचा फटका बसत असून अनेक दिवस पालकांपासून संवादाविना राहावे लागत आहे. यामुळे पालक वर्गामध्ये काळजीचे वातावरण पसरत आहे. सोबतच येथे रास्त दराचे धान्य दुकान असून त्याला आवश्यक असणारी इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांना पुरवठा केले जाणारे धान्य वितरित करता येत नाही.ग्रामपंचायतीचा कारभार देखील नेटवर्क विना विस्कळीत झाल्याचे दिसून येते. याबाबत वारंवार बीएसएनएल आणि जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे समस्या मांडून देखील त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे या परिसरामध्ये सदर कंपनीच्या कारभाराबाबत प्रचंड नाराजी पसरली असून येत्या आठ दिवसांमध्ये कंपनीने आपल्या कारभारामध्ये सुधारणा न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य आदिल सदगुरो यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments