Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या कामगिरीचे कौतुक*

*चिपळूणचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या कामगिरीचे कौतुक*

*चिपळूण* : रामपूर येथील भीषण हत्याखंडाचा अवघ्या २४ तासात तपास
लावून आरोपींना गजाआड करणारे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दोन दिवसांपूर्वी घडलेल्या आणखी एका गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे. दागिने चोरीप्रकरणाचा अवघ्या एका दिवसात छडा लावून एका महिलेला ताब्यात घेऊन दागिने चोरी गेलेल्या महिलेचे दागिने पुन्हा परत मिळवून देण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली आहे.

पोलीस निरीक्षक मेंगडे हे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. दोन वर्षांपूर्वी २०२४ मध्ये त्यांची चिपळूण पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. त्यांनी चिपळूणमध्ये गांजा तस्करीविरोधी कारवाई आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तसेच एप्रिल २०२६ मध्ये रामपूर येथील भीषण हत्याकांडाचा अवघ्या २४ तासांत तपास लावून दोन आरोपींना अटक केली होती.

दोन दिवसांपूर्वी चिपळूण येथील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधून ११ तोळ्याचे सुमारे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर संबंधित महिलेने चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार मेंगडे यांनी पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी व चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली याही गुन्ह्याचा तपास अवघ्या दोन दिवसात लावून मेंगडे यांनी आपली कर्तव्यदक्षता दाखवून दिली आहे. दरम्यान, मेंगडे यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलली असून त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments