Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रवादी खेड शहराध्यक्ष प्रणव म्हापूसकरांसह अनेकांचा भाजपा मध्ये प्रवेश;

राष्ट्रवादी खेड शहराध्यक्ष प्रणव म्हापूसकरांसह अनेकांचा भाजपा मध्ये प्रवेश;

खेड शहर परिसरात भाजपा मध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असून, विविध पक्षांतील पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड शहराध्यक्ष प्रणव म्हापूसकर तसेच युवक काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष स्वराज गांधी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. पंतप्रधान सन्मा.नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री सन्मा.देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.रवींद्रजी चव्हाण आणि भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.श्री.वैभवजी खेडेकर यांच्या कार्यप्रेरणेने प्रेरित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले. भडगाव येथील ॲड.वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा मंगळवार 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश सुर्वे आणि राजेश कदम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश विजय गुप्ता यांच्या प्रयत्नातून पार पडल्याचे सांगण्यात आले. भाजपा खेळ शहराध्यक्ष श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी आणि भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड.मिलिंद नांदगावकर यांनी या तरुणांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले. कोणतेही राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसतानाही समाजासाठी काम करणाऱ्या ऱ्या तरुणांनी आता भाजपच्या झेंड्याखाली कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाला भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री.रहिम सहिबोले, विद्यमान नगरसेविका सौ.वैभवी ताई वैभव खेडेकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्यांक सेल खेड शहर अध्यक्ष श्री.नईम चौगुले, उद्योजक श्री.राहुल पाटणे, श्री.वैजेश सागवेकर, श्री.मंदार आपटे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अक्षय सनगरे, अनिकेत पवार, प्रशांत बारटक्के, प्रदीप भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्वास व्यक्त केला की, अशा कार्यक्षम तरुणांच्या प्रवेशामुळे आगामी काळात खेड तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात भाजपचे प्राबल्य वाढेल. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत ‘शतप्रतिशत भाजप’चे लक्ष्य साध्य होईल, असा दावा देखील करण्यात आला. दरम्यान, भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.श्री.वैभवजी खेडेकर यांनी पक्षप्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांना योग्य तो मान-सन्मान देऊन त्यांना पुढे नेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे भाजप संघटना अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments