Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedशृंगारतळीतील पिकअपशेडमध्ये बसवणार बाकडी; आंदोलन स्थगित

शृंगारतळीतील पिकअपशेडमध्ये बसवणार बाकडी; आंदोलन स्थगित

गुहागर (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील एसटी पिकपशेडमध्ये त्वरित बाकडी बसविण्यात येणार असून तसे लेखी पत्र उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग चिपळूण यांनी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे तूर्तास येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे.

शृंगारतळी येथील एसटी पिकअपशेडमध्ये अद्याप बाकडी बसवण्यात आली नसल्याने पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला होता. ही पिकअपशेड रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या दरम्यान तोडण्यात आली होती. याचठिकाणी ही शेड महामार्गाच्या कामाअंतर्गत उभारण्यात आली. शेड उभारताना या ठिकाणच्या गाळाधारकांकडून वारंवार विरोध करण्यात आल्यामुळे कामास विलंब होत गेला. त्यानंतर दि. २५/०९/२०२५ रोजी पोलिस बंदोबस्तात शेडचे काम करण्यात आले. मात्र त्यावेळी बाकडी बसविण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी २ वेळा पिकअपशेडमध्ये बाकडी बसवण्यासाठी गेले होते. परंतु तेव्हा देखील या ठिकाणच्या गाळाधारकांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी विनंती गुहागर पोलिसांकडे करण्यात आली आहे. लवकरच बाकडे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून रास्ता रोको आंदोलन करू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती पत्राद्वारे चिपळूण महामार्ग अधिकाऱ्यांनी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments