Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोवळकोट रोडच्या मुख्य रस्त्याची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली पाहणी* *मोजणी व...

गोवळकोट रोडच्या मुख्य रस्त्याची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली पाहणी* *मोजणी व लाईनआऊटचे आदेश*

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील गोवळकोट रोडवरील मुख्य रस्त्याची पाहणी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुक्रवारी सकाळी केली. यावेळी विकास आराखड्यात (डीपी) या रस्त्याची किती रुंदी आहे, याची तातडीने नोंद घ्यावी, मोजणी करून लाईनआऊट करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
गोवळकोट रोड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून या परिसरात गटार व सांडपाण्याचा गंभीर प्रश्न असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी चार वाजता बांधकाम, आरोग्य, तसेच संबंधित विभागांची चिपळूण नगर परिषदेत संयुक्त बैठक घेण्याचे आदेश नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिले. “शहरातील स्वच्छता आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा हे दोन महत्त्वाचे मुद्दे मी स्वतः हातात घेतले आहेत. या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. गोवळकोट रोड रुंद करण्यासाठी तसेच आवश्यक गटार व्यवस्था उभारण्यासाठी तातडीने मोजणी व मार्किंग करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
या पाहणीवेळी नगरसेविका सफा गोठे, नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेविका रूपाली दांडेकर, नगरसेवक प्रमोद बुरटे, शिवसेना विभाग प्रमुख फैसल मेमन, नगरसेवक निहार कोवळे यांच्यासह आरोग्य निरीक्षक वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, बांधकाम विभागाचे अभियंते महेश डफळ व दीपक निंबाळकर, बांधकाम मिस्त्री रवी सातपुते व प्रवीण जाधव, बांधकाम लिपिक रमेश कोरवी, रोहन सकपाळ, अभियंता विभागाचे साहिल कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments