Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद व मजबूत करणार; नागरिकांच्या सहकार्याची गरज- नगराध्यक्ष उमेश...

*शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद व मजबूत करणार; नागरिकांच्या सहकार्याची गरज- नगराध्यक्ष उमेश सकपाळ*

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंदीकरण करून ते मजबूत करण्याचा निर्धार नगर पालिकेने केला असून यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, अशी अपेक्षा चिपळूण नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केली. शुक्रवारी सकाळी त्यांनी अमेय पार्क येथून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची पाहणी करताना स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, सदर रस्ता मूळतः १२ मीटर रुंदीचा आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात तो अस्तित्वात दिसून येत नाही. त्यामुळे तात्काळ मोजणी करून रस्त्याचे मार्किंग करावे, रस्ता ताब्यात घ्यावा आणि शासनाकडून निधी उपलब्ध करून हा रस्ता नियोजनबद्ध पद्धतीने रुंद करण्यात येईल. रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. एसटी बसेस याच मार्गावरून रेल्वे स्टेशनकडे प्रवासी आणतात. मात्र, एसटी बस आल्यास दुचाकी वाहनांना जाण्यास अडचण निर्माण होते. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था खराब होते. त्यामुळे चांगल्या दर्जाचा, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा रस्ता करण्याचा मानस असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. रस्त्यासाठी आवश्यक जागा देण्याची गरज भासल्यास स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले.
या पाहणीवेळी स्थानिक नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक निहार कोवळे, पप्पू लाने, शौर्य निमकर, समीर जंगम, शुभम कदम, शिवा खंडझोडे आदी उपस्थित होते. तसेच आरोग्य निरीक्षक वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, बांधकाम विभागाचे अभियंते महेश डफळ व दीपक निंबाळकर, बांधकाम मिस्त्री रवी सातपुते व प्रवीण जाधव, बांधकाम लिपिक रमेश कोरवी, रोहन सकपाळ, अभियंता विभागाचे साहिल कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments