Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*खेर्डीचा पाणीप्रश्न सुटणार; ३३ लाखांचे अंदाजपत्रक आणि प्रस्ताव सादर*

*खेर्डीचा पाणीप्रश्न सुटणार; ३३ लाखांचे अंदाजपत्रक आणि प्रस्ताव सादर*

चिपळूण (प्रतिनिधी) : एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांच्या भेटीनंतर खेर्डीच्या पाणी प्रश्नाला गती मिळाली असून, ग्रामस्थांना आता फिल्टर केलेले स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खेर्डी येथील पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या प्रश्नी उमेश खताते यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, या कामासाठी ३३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक आणि प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. आज रत्नागिरी येथे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांची भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान खेर्डीच्या पाणी योजनेवर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी माजी उपसरपंच विजय शिर्के समीर कदम, विराज खताते, अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने हा प्रकल्प मार्गी लागत आहे. खेर्डीवासीयांना शुद्ध आणि फिल्टर केलेले पाणी मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ३३ लाखांचा प्रस्ताव सादर झाल्यामुळे आता लवकरच प्रत्यक्ष कामाला मंजुरी मिळेल.
चौकट-
खेर्डीच्या जनतेला स्वच्छ पाणी मिळावे ही आमची प्राथमिकता होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे आणि प्रशासकीय पाठपुराव्यामुळे ३३ लाखांचे अंदाजपत्रक प्रस्ताव आज सादर झाले असून लवकरच हा प्रश्न कायमचा निकाली लागेल.
-उमेश खताते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments