चिपळूण (वार्ताहर) : श्रीमती रुक्मिणीबाई माटे शिक्षण संस्था कामथेचे, नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डुगवे शिरवली विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश नामदेव कोकाटे यांना रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा रत्नागिरी जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
संदेश कोकाटे हे नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डुगवे शिरवली या विद्यालयात मुख्याध्यापकपदी जून १९९२ पासून कार्यरत आहेत .संस्थेचे संस्थापक स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब माटे व सध्याचे संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ.विजयशेठ माटे साहेब यांचा विश्वास सरांनी सार्थ ठरविला . ज्ञान संस्कार आणि संस्कृतीचे शिंपण करीत विद्यार्थ्यांमध्ये नवीन पिढी विकसित करण्याचे भाग्य सरांना लाभले .शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन विद्यालयामध्ये सहकारी शिक्षकांसमवेत करण्यात आले .इयत्ता दहावी व बारावीचा निकाल गेले अनेक वर्ष जवळपास शंभर टक्के लागत आहे.विविध स्पर्धा ,विज्ञान विषयक उपक्रम क्रीडा स्पर्धा यांच्यामध्ये विद्यालयतील विद्यार्थ्यांनी नैपुण्य सिद्ध केले आहे.विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक ,राजकीय क्षेत्रामध्ये मौलिक कामगिरी करीत आहेत .शांत , संयमी, नम्र , प्रामाणिक स्वभावामुळे सरांचे संस्था, शालेय समिती , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी , पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्ती यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत . विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये संस्था, शालेय समिती, ग्रामस्थ यांच्या बरोबरीने सरांचा मोलाचा वाटा आहे.शालेय समिती चेअरमन सौ. माधुरी गोखले वहिनी व सर्व समिती सदस्य , पालक,ग्रामस्थ, माजी विद्यार्थी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मौलिक सहकार्य सरांना लाभत आहे. संदेश कोकाटे यांनी शैक्षणिक सामाजिक विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे.सर चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे .रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामध्ये विविध पदावर प्रभावीपणे काम केले आहे .तसेच रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी या पतपेढीचे तज्ञ संचालक म्हणून सरांनी काम केले आहे . सरांच्या गावातील ज्ञानदीप वाचनालय, ओमळी येथे काम केले आहे. अशा विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांवर , सर आजही काम करीत आहेत. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम करताना सरांनी केलेल्या कामाचे कौतुक जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने करण्यात आले आहे. सरांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजयशेठ माटे, शालेय समिती चेअरमन सौ. माधुरी गोखले वहिनी, सर्व समित्यांचे अध्यक्ष, सचिव ग्रामस्थ , पालक, माजी विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सरांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुख्याध्यापक संदेश नामदेव कोकाटे यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान*
RELATED ARTICLES



