Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedरामपूर विद्यालयाचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश*

रामपूर विद्यालयाचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश*

चिपळूण (वार्ताहर) : सन २०२५-२६ मध्ये झालेल्या इयत्ता आठवी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत मिलिंद हायस्कूल व मोतीबाई एम. ठाकरसी जुनिअर कॉलेज रामपूर या प्रशालेचा, इयत्ता आठवीचा विद्यार्थी, कुमार सोहम सुनील बारे याने घवघवीत यश संपादन केले.
अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातून शिक्षण घेत असलेल्या सोहमने गुणवत्ता यादीत ३२ वा क्रमांक प्राप्त करून उत्तुंग यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल रामपूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वीरकर सर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी त्याचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments