चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (ता. 28) हॉटेल अभिरुची येथील सभागृहात आमदार योगेश सागर, प्रदेश महामंत्री तथा जिल्हा प्रभारी, आमदार निरंजनजी डावखरे आणि रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, देवरुखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अजित निकम, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व मंडल अध्यक्ष, मंडलाचे सरचिटणीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याच्या वतीने योगेशजी सागर आणि निरंजनजी डावखरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी सर्व मंडलांच्या वतीने भाजप स्थापना दिवस, पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान, एस. आय. आर. अभियान यांचा आढावा सादर केला. तसेच यावेळी आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी जिल्हा पदाधिकारी आणि विविध सेलच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी प्रस्ताविक केले. चिपळूण शहर मंडल सरचिटणीस सारिका भावे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू यांनी सर्वांचे आभार मानले.
भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात* *आमदार योगेश सागर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांची प्रमुख उपस्थिती*
RELATED ARTICLES



